Photobucket

Monday, March 22, 2010

मैत्री

Bookmark and Share
मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते
खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही
पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या
नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा
हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती
सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे
मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या
उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे
बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या
गालात हसणारे

0 comments:

Previous Next home